34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभांगेला औषध म्हणून मान्यता

भांगेला औषध म्हणून मान्यता

संयुक्त राष्ट्रसंघात निर्णय; भारत-पाकिस्तानकडून विरोध

एकमत ऑनलाईन

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना जगाची मान्यता मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही भांगेचा औषध म्हणून वापर करण्यास मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघात अंमली पदार्थाच्या यादीतून भांगेला वगळण्याबाबत मतदान झाले. प्रस्तावावर मतदान झाले असून त्यात २७ सदस्य देशांनी प्रस्तावाच्या बाजूने आणि २५ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले. परिणामी जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या अंमली पदार्थ आयोगाने भांगेला अंमली पदार्थाच्या यादीतून वगळले आहे.

वैद्यकीयशिवाय इतर वापरावर बंदी कायम
संयुक्त राष्ट्र संघाने औषध म्हणून मान्यता दिली असली तरी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणांसाठी त्याचा वापर करण्यास बंदी कायम ठेवली आहे. ऐतिहासिक मतदानात अमेरिका आणि ब्रिटनने यादीतील बदलाच्या बाजूने मतदान केले, तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया, रशिया आदी देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.

५० देशांमध्ये औषध म्हणून वापर
भारतात हजारो वर्षांपासून भांगेचा वापर करण्यात येतो. धार्मिक कर्मकांडातही त्याचा वापर करण्यात येतो. चीन आणि इजिप्तमध्येही भांगेचा वापर हजारो वर्षांपासून औषध म्हणूनच करण्यात येतो. जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये भांगेचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेतील १५ राज्यांमध्ये भांगेचा औषधी वापर करण्यास परवानगी आहे.

शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यात आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या