32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनकडून चौक्यांची पुन्हा निर्मीती

चीनकडून चौक्यांची पुन्हा निर्मीती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर चीनकडून उचापत्या सुरूच असून, सीमेवरून मागे हटल्याचा दावा करणाºया चीनचा डाव उघडकीस आला आहे़ देप्सांगपासून २५ किलो मिटर अंतरावर चीनने आपल्या चौक्यांचा विस्तार केला असल्याचा पुरावा सॅटेलाईट चित्रावरून स्पष्ट झाला आहे़ यावरुन चीन केवळ शांततेचा बनाव करीत असल्याचे दिसून येत आहे

एकीकडे सैन्य मागे घेतलेले असताना दुसरीकडे चीनच्या सीमेवरील उचापत्या सुरूच आहेत. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरातून लष्कर मागे घेतले . गेल्यानंतर चीनचा आणखी एक डाव उघड झाला आहे. सिंथेटिक अपेर्चर रडारने देप्सांग परिसरात काही दृश्य टिपली असून, यात चीनकडून एलएसीजवळ बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे. नव्या फोटोतून चीनने चौकीजवळ कायमस्वरूपी बांधकाम केल्याचे दिसत असून, २५ फेब्रवारी रोजी सॅटेलाईटने हे फोटो घेतले आहेत.

सैन्य मागे घेऊन सीमेवर शांतता प्रस्तापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकलेले असतानाच चीनकडून देप्सांग परिसरात बांधकाम करण्यात आले आहे. भारतातील सर्वात उंचावरील हवाई तळ असलेल्या लडाखमधील दौलत बेग ओल्डीपासून २४ किमी अंतरावर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. २४ किमी अंतरावर अक्साई चीन परिसर असून इथे चिनी लष्कराची चौकी आहे. १९६२ च्या युद्धानंतर इथे ही चौकी निर्माण करण्यात आली होती. मात्र, मागील काही वर्षांपासून इथे सातत्याने बांधकाम केले जात आहे.

सरंक्षक जाळीसह अनेक बांधकामे
नव्यानेच टिपलेल्या सॅटेलाईट फोटोतून हे दिसत आहे की, चौकीच्या मुख्य इमारतीजवळ आणि बांधकाम करण्यात आले आहे. हे आॅगस्ट २०२० पासून सुरू असून, कॅम्प्स आणि गाड्याही दिसत आहेत. त्याचबरोबर संरक्षक जाळीही बसवण्यात आली आहे.

सर्व प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज
२५ फेब्रुवारी रोजी सॅटेलाईटने घेतलेल्या या फोटोतून बºयाच गोष्टी दिसत आहे. चिनी लष्कराने टँक आणि जवानांना भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. मुख्य इमारतीजवळ आणखी बांधकाम करण्यात आल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सोलर पॅनल्स, अँटेना टॉवर, डिफेन्स सिस्टीम आणि भिंत बांधण्यात आलेली आहे. या परिसरात अनेक निवासगृह तयार करण्यात आलेले असून, गलवान व्हॅलीत भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर हे बांधकाम करण्यात आलेले आहे़

शेतमालावर प्रक्रियेसाठी क्रांतीची गरज – नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या