22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेन, चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

युक्रेन, चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

एकमत ऑनलाईन

युक्रेन, चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान मायदेशी परतलेल्या २०,००० वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयामुळे हे शक्य झाले. युक्रेनमधून सुमारे २० हजार भारतीय विद्यार्थी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी नॅशनल मेडिकल कमिशनने नियमांचा हवाला देत आपले करिअर पणाला लावून परत आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

मात्र, सरकारच्या आजच्या निर्णयामुळे रशियासोबत सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमधून भारतात परतलेल्या अनेक एमबीबीएस विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहे.

नॅशनल मेडिकल कमिशनने २३ जून रोजी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अशा परदेशी वैद्यकीय पदवीधरांना एक वर्षाएवजी दोन वर्षांसाठी अनिवार्य रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप करावी लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या