वाॅशिंग्टन : सोशल मीडियावर अमेरिकेतील एका लहानग्या मुलाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. शेफर्ड मिक्स कुत्र्याच्या हल्ल्यापासून आपल्या बहिणीला सुखरूप वाचवलं. पण झटापटीत आपल्या लहान बहिणीला वाचवताना ब्रिजरला मात्र गंभीर जखमा झाल्या आहेत. कुत्र्यानं घेतलेल्या चाव्यानं ब्रिजरच्या चेहऱ्याला तब्बल 90 हून अधिक टाके पडले. शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर आता तो बरादेखील झाला आहे.
हि घटना अमेरिकेच्या व्योमिंग प्रांतातील ब्रिजर वाॅकर येथील असून अवघ्या 6 वर्षीय मुलानं दाखवलेल्या या धाडसाचं जगभरातून कौतुक होत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं राखी बांधल्यानं ब्रिजरचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ब्रिजरची काकी निकोलनं या भावंडांचा रक्षाबंधन साजरा करतानाचा फोटो इन्टाग्रावर टाकताना लिहीलं आहे की, ‘ब्रिजरची गोष्ट सर्वांना प्रेरणादायी वाटली. मेक्सिको, ब्राझिल, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, जपान आणि भारतासारख्या देशांतून ब्रिजरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.
A post shared by Nikki Walker (@nicolenoelwalker) on
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. बहिणीचं भावावरचं प्रेम यातून प्रतित होतं. तर भाऊ यावेळेस बहिणीचं संरक्षण करण्याचं वचन देत असतो. भावाबहिणीचं एकमेकांना सांभाळून घेण्याची भावना किती आनंददायी आहे. आज आम्हाला रक्षाबंधन साजरा करायला मिळाला याचा आनंद फारच वेगळा आहे, अशा भावना निकोलनं आपल्या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
कंधार :कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणा-या नगर परिषद अधिकारी,कर्मचारी व आरोग्य कर्मचा-यांना कोविड योद्धा म्हणून भाजप महिला मोर्चाच्या वतिने सत्कार करण्यात आला.
नागरीकांच्या आरोग्याची...
उस्मानाबाद : वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या म्हणीप्रमाणे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी राखी पौर्णिमेनिमित्त वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. प्रदूषणमुक्त वातावरण तयार...
लातूर : उदगीर जवळील तोंडार पाटी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित बहिण, भाऊ उपचार घेत आहेत. सोमवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला गेला. त्यानिमित्ताने...