मिलान : कोरोनाची उत्पत्ती चीनमधील वुहानमध्ये झाल्याचे सांगितले जात असले तरी इटलीतील मिलानमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी हा दावा फेटाळला असून कोरोनाचा विषाणू इटलीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आढळून आल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनाही आता या संशोधनाचा अभ्यास करणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार असून याची साथ येण्याआधी यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नव्हती असे म्हटले होते. तसेच मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य चीनमधील वुहान प्रांतामध्ये कोरोना विषाणूची उत्पत्ती झाल्याचेही सांगितले होते.
सप्टेंंबर २०१९ पुर्वीच सापडले रुग्ण
इटलीमधील संशोधकांनी केलेल्या दाव्यानूसार इटलीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण २१ फेब्रुवारी रोजी लोम्बार्डी प्रांतामधील मिलानजवळच्या छोट्या शहरामध्ये आढळला होता. मात्र त्यापुर्वी इटालियन संशोधकांनी ९५९ तरुणांच्या फुप्फुसांचे स्कॅनिंग करुन त्यांना कॅन्सरची शक्यता तपासण्याबाबत चाचण्या केल्या होत्या. सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान केलेल्या या चाचण्यांमध्ये यापैकी ११.६ टक्के तरुणांच्या शरीरात इटलीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळण्याआधीच म्हणजेच फेब्रुवारीआधीच कोरोनाविरुद्ध लढा देणाºया अॅण्टीबॉडीज निर्माण झाल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे.
यानंतर सार्स कोव्हीड-टू या विषाणूसाठीच्या अॅण्टीबॉडीजची चाचणी सिएना विद्यापीठामध्ये करण्यात आली. ‘इटलीमध्ये साथपूर्वी कालावधीमध्ये अनपेक्षितपणे सार्स कोव्हीड-टू अॅण्टीबॉडीज सापडण्यासंदर्भात,’ अशा मथळ्याखाली हा अहवाल तयार केला आहे. त्यामध्येही मागील वर्षी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच काही स्वयंसेवकांच्या शरीरामध्ये अॅण्टीबॉडीज आढळून आल्याचे म्हटले आहे. म्हणजेच या चार जणांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये करोनाचा संसर्ग झाला होता असा दावा अहवालाचे लेखक जिओव्हानी ओप्लोवन यांनी केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील 52 ग्रामपंचायत च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर