18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनेपाळच्या हुमलामध्ये चीनकडून स्थानिकांनाच निर्बंध

नेपाळच्या हुमलामध्ये चीनकडून स्थानिकांनाच निर्बंध

एकमत ऑनलाईन

काठमांडू : चीनने नेपाळच्या हद्दीतील हुमला या भागात आपला जम बसविला असून, बांधकामेही केल्याचे वृत्त २३ सप्टेंबर रोजी आले होते. अर्थात तेव्हाही या भागातील रहिवाशांनी चिनी हस्तक्षेपाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला होता; पण आता विरोधी पक्षनेते जीवन बहादूर शाही यांनी हे प्रकरण उचलले आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने ड्रॅगनला डोक्यावर बसवले आहे, असा घणाघात शाही यांनी केला आहे.

चीनने नेपाळच्या या भागात नेपाळी लोकांच्याच येण्या-जाण्यावर बंदी घातली आहे. खाद्यपदार्थांनी भरलेले ट्रकही चिन्यांकडून रोखले जात आहेत. स्थानिक रहिवासी तसेच व्यापा-यांना माल वाहतूकदारांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे शाही यांनी सरकारच्या निदर्शनाला आणून दिले. जी इमारत चीनकडून या भागात बांधण्यात आलेली आहे, ती नेपाळच्या हद्दीत नाही, असेही नेपाळ सरकारने म्हटले होते आणि आपल्याच देशवासीयांना खोटे पाडले होते. हुमलाचे लोक खोटे बोलत आहेत, असे ओली सरकारने म्हटले आहे.

सरकारचे धोरण चीनवादी
शाही करनाली प्रांतातून निवडून आलेले आहेत. ते स्वत: हुमला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शाही यांनी स्वत: घटनास्थळाची पाहणी केली. हुमला आणि सीमेला लागून असलेल्या काही भागांवरील चीनच्या अवैध ताब्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे; पण विद्यमान सरकारच्या चीनवादी धोरणांमुळे ओलींच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांचा आवाजच निघत नाही, अशी टीकाही शाही यांनी केली आहे.

हाथरस प्रकरण : सुनावणी मुंबई-दिल्लीला हलवण्याची कुटुंबाची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या