23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपूर्व लडाखमधून चिनी सैनिकांची माघार

पूर्व लडाखमधून चिनी सैनिकांची माघार

एकमत ऑनलाईन

मॅक्सार टेक्नॉलॉजीने जारी केले छायाचित्र
लडाख : चिनी लष्कराने पूर्व लडाखमधील कळीच्या गोगरा-हॉटस्प्रिंगमधून ३ किमी लांब माघार घेतली आहे. हा खुलासा मॅक्सार टेक्नॉलॉजीने जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांतून झाला आहे. मे २०२० पासून दोन्ही देशांचे सैन्य या भागांतील पेट्रोलिंग पॉइंट-१५ जवळ एकमेकांपुढे ठाण मांडून बसले होते. यामुळे दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला होता.

गत १७ जुलै रोजी भारत-चीनच्या लष्करी अधिका-यांत कोअर कमांडरस्तरीय चर्चेची १६ वी फेरी झाली. त्यात ८ सप्टेबर २०२२ रोजी कळीच्या ठिकाणावरून सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले. या अंतर्गत दोन्ही देशांच्या लष्कराने सुनियोजितपणे पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्जमधून (पीपी-१५) माघार घेतली.

सॅटेलाइट छायाचित्रांत दिसून येते की, एक वर्षापूर्वी १२ ऑगस्ट २०२१ रोजी डिसएंगेजमेंटपूर्वी गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात चीनची एक लष्करी पोस्ट दिसून येत आहे. पण नव्या छायाचित्रात ती त्या ठिकाणी दिसत नाही. या प्रकरणी दोन्ही देशांतील सहमतीनुसार यापुढे या भागात दोन्ही देशांचे सैन्य पेट्रोलिंग करणार नाही. यापूर्वीच्या सॅटेलाइट फोटोत चिनी लष्कराने एलएसीच्या अलिकडील भारतीय हद्दीत एक इमारत बांधल्याचे दिसून येत होते. चीनच्या २०२० च्या घुसखोरीपूर्वी भारतीय लष्कर या भागात नियमित गस्त घालत होते. दुसरीकडे १५ सप्टेबर २०२२ च्या उपग्रहीय छायाचित्रांत ही इमारत त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे चीनने ही पोस्ट दुस-या भागात हलवल्याचे स्पष्ट होत आहे.

भारतानेही आपली पोस्ट मागे घेतली
लडाखमधील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मते, चीनसोबतच्या तडजोडींतर्गत भारतीय लष्करानेही भारतीय हद्दीतील आपली पोस्ट अलीकडे घेतली आहे. पण दिल्लीतील लष्करी अधिका-यांनी त्याची पुष्टी केली नाही. लडाखच्या चुशूल क्षेत्राचे नगरसेवक कोंचोक स्टेनजिन यांनी एनडीटीव्हीला बोलताना सैनिकांनी केवळ पेट्रोलिंग पॉइंट १५ च (पीपी-१५) नव्हे तर पीपी-१६ वरूनही माघार घेतल्याचा दावा केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या