27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीय‘भारतीय’ वंशाचे ऋषी सुनक करणार इंग्रजांवर राज्य?

‘भारतीय’ वंशाचे ऋषी सुनक करणार इंग्रजांवर राज्य?

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आजच (गुरुवार) आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरपासून राजकारणी झालेल्या ऋषी सुनक यांचे नाव पंतप्रधान म्हणून चर्चेत आले आहे.

ऋषी सुनक यांना पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. बोरिस जॉन्सन सरकारमधील विद्यमान मंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी नाधिम झहावी यांची ब्रिटनचे नवीन अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरपासून राजकारणी झालेल्या ऋषी सुनक यांनी बोरिस जॉन्सन सरकारमधील एका घोटाळ्यानंतर राजीनामा दिला.

अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरे महत्त्वाचे पद मानले जाते. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत. तसेच सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा रिचमंड मतदारसंघातून ब्रिटीश संसदेत निवडून आले. २०१७ मध्ये ते पुन्हा निवडून आल.

कोण आहेत ऋषी सुनक?
ऋषी सुनक हे ब्रिटनचे रहिवासी आहेत. सध्या ते ब्रिटनच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ते ब्रिटनमधील रहिवासी असले तरीही त्यांची पाळेमुळे मात्र भारताशी जोडली गेली आहेत. सध्याच्या घडीला सुनक यांच्या कामाने अनेकजण प्रभावित असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय त्यांना पंतप्रधानपदासाठीचा प्रबळ दावेदारही मानले जात आहे.

ऋषी सुनक यांचा जन्म…
ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या आजी-आजोबांसोबत ब्रिटनला गेले होते. त्यानंतर १९८० मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला. त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतले. त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले.

राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती.

नारायण मूर्ती यांचे जावई
भारतीय सॉफ्टवेयर कंपनी इंफोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे ऋषी सुनक यांचे सासरे आहेत. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता ही ऋषी यांची पत्नी आहे.ऋषी आणि अक्षता यांना दोन मुली आहेत. २००९ मध्ये ऋषी यांचा विवाह अक्षताशी झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या