26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयनाटोच्या भूमिकेवर रशिया, चीन नाराज

नाटोच्या भूमिकेवर रशिया, चीन नाराज

एकमत ऑनलाईन

माद्रिद : ‘नाटो’ ने रशियाला थेट ‘धोका’ तर चीनला जागतिक स्थैर्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे जाहीर केल्यानंतर हे दोन्ही देश चांगलेच खवळले आहेत. येथे पार पडलेल्या संघटनेच्या दोन दिवसीय संमेलनामध्ये विविध सुरक्षाविषयक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. ‘नाटो’च्या सदस्य देशांनी फिनलंड आणि स्वीडन या दोन देशांना या आघाडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या देशांच्या सहभागाला मान्यता मिळाल्यास रशियाला लागून असलेली १ हजार ३०० किलोमीटरची सीमा थेट नाटोच्या ताब्यात येऊ शकेल.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी याआधीच या दोन्ही देशांना ‘नाटो’शी हातमिळवणी केल्यास अथवा त्यांचा भूभाग हा इतर देशांना वापरण्याची परवानगी दिल्यास याची जबरकिंमत मोजावी लागू शकेल असा इशारा दिला आहे. चीनने देखील ‘नाटो’च्या भूमिकेचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. ‘नाटो’ द्वेषमूलक भावनेतून आमच्या देशाला कलंकित करण्याचे काम करत असल्याचा आरोप चीनने केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या