39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeआंतरराष्ट्रीयचार दिवसात रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा रशियाचा निष्कर्ष

चार दिवसात रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा रशियाचा निष्कर्ष

- रशियन शास्त्रज्ञांनी मूळ जपानी औषधात केले बदल

एकमत ऑनलाईन

मास्को: वृत्तसंस्था
रशियाने कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध विकसित केले आहे. पुढच्या आठवडयापासून रशियामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरु होणार आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या नव्या औषधामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल तसेच विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येऊन सर्वसामान्य जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

एविफेविर या नावाने औषधाची नोंदणी झाली आहे. पुढच्या आठवडयापासून म्हणजे ११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत. रशियाच्या आरडीआयएफ प्रमुखाने रॉयटर्सला ही माहिती दिली. एविफेविर औषध बनवणारी कंपनी महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात औषध बनवणार आहे.

Read More  राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणारी सध्या कुठलीही लस उपलब्ध नाही आहे़ आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या काही औषधांच्या चाचण्या सुरु असून, काही औषध प्रभावी सुद्धा ठरत आहेत. अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस या कंपनीने बनवलेले रेमडेसिविर हे अँटीव्हायरल औषधही कोरोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे.
एविफेविर हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. १९९० साली जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर केला जातो.

फॅव्हीपीरावीर हे मूळचे जपानी औषध आहे. त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी रशियन शास्त्रज्ञांनी त्यामध्ये काही बदल केले आहेत. पुढच्या दोन आठवडयात रशियाकडून बदल करुन बनवण्यात आलेल्या या औषधाबद्दल जगाला माहिती दिली जाईल असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले. रशियात कोरोनाची लागण झालेल्या ३३० रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. बुहतांश केसेसमध्ये रुग्ण हे चार दिवस पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आले, असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या