32 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home आंतरराष्ट्रीय रशियाने तयार केली कोरोनावरील लस!

रशियाने तयार केली कोरोनावरील लस!

एकमत ऑनलाईन

मास्को : कोरोनाचे संकट अख्ख्या जगाला भेडसावत आहे. त्यामुळे अमेरिका, रशिया, चीन, भारतासह सर्वच पीडित देश कोरोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, यात रशियाने बाजी मारली असून, सेचेनोव्ह विद्यापीठाने ही लस विकसित केल्याचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे या लसीच्या सर्वच चाचण्या यशस्वी झाल्या आहेत, असेही रशियाचे म्हणणे आहे. हे सिद्ध झाल्यास ही कोरोना व्हायरसवरील पहिली लस ठरेल. लस विकसित करण्यासाठी भारतासह अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटनही प्रयत्नशील आहेत. बºयाच देशांत ट्रायलही सुरू आहेत. मात्र, रशियाने तर लस विकसित केल्याचा दावा करीत आघाडी घेतली आहे.

यासंदर्भात माहिती देताना इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजीचे  संचालक वदिम तरासोव यांनी विद्यापीठाने १८ जूनलाच रशियाच्या गेमली इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅपिडेमियोलॉजी अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या लसीच्या परीक्षणाला सुरुवात झाली होती, असे म्हटले आहे.

सेनेचोव्ह विद्यापीठाने कोकोना व्हायरसविरोधातील जगातील पहिल्या लसीचे स्वयंसेवकांवरील परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे, असेही ते म्हणाले. इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल पॅरासिटोलॉजी आणि ट्रॉपिकल अ‍ॅण्ड वेक्टर-बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांनी या संपूर्ण संशोधनाचा हेतू मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोविड-१९ वरील लस यशस्वीपणे तयार करणे हा होता, असे म्हटले. सुरक्षिततेच्या दृष्टीने या लसीची सर्व बाबींची तपासणी केली आहे. तसेच लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

लसीच्या उत्पादनासाठी सेचेनोव्ह विद्यापीठ सक्षम
सेचेनोव्ह विद्यापीठाने केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणूनच नाही, तर एक वैज्ञानिक आणि टेक्निकल रिसर्च केंद्र म्हणूनही कौतुकास्पद काम केले आहे. कोरोना महामारीच्या काळात कोरोना औषधीसारख्या महत्त्वपूर्ण आणि जटिल उत्पादनासाठी हे विद्यापीठ सक्षम आहे, असे सांगतानाच इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी परीक्षणातील स्वयंसेवकांच्या दुसºया गटाला २० जुलैला सुटी देण्यात येईल, असे म्हटले आहे.

चीनमध्येही तयारी अंतिम टप्प्यात
चीनमध्येदेखील मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे. सरकारी आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोना संसर्ग खूप कमी झाला आहे.

मात्र, लसीच्या चाचण्यांसाठी अशा भागातील स्वयंसेवकांवर ट्रायल करावे लागते, जेथे कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे चीनने परदेशात लसीची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. कॅन्सिनो बायोलॉजिक्सचे सहसंस्थापक किऊ डोंग्झू यांनी परदेशात चाचणीच्या योजनेबद्दल माहिती दिली. डोंग्झू म्हणाले की, फेज-३ चे ट्रायल लवकरच सुरू होईल. एकूण ४० हजार लोकांना लस डोस देण्याची तयारी सुरू आहे. कॅन्सिनो बायोलॉजिक्सने एडी-५-एनसीओव्ही नावाची कोरोना लस विकसित केली आहे.

अमेरिकेतील कंपनीची आघाडी
कोरोनाच्या संकट काळात जगभर कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात अमेरिकाही आघाडीवर आहे. अमेरिकेतील बायोटेक कंपनी मॉडर्नाने आपल्या लसीचे परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी लस चाचणीच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून, ३० हजार जणांवर कोरोना व्हायरस लस देण्याची योजना असल्याचे म्हटले आहे.

Read More  आता भारतात हायटेक स्टेडियमवर भर पावसात खेळा क्रिकेटचे सामने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या