28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीय‘स्पुटनिक लाइट’ला रशियाची मान्यता

‘स्पुटनिक लाइट’ला रशियाची मान्यता

एकमत ऑनलाईन

मॉस्को : भारतात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला आधीच मंजुरी देण्यात आली आहे़ आता रशियाने तयार केलेल्या स्पुटनिक लाइट लसीला रशियाने मंजुरी दिली आहे. या लसीचाा फक्त एकच डोस पुरेसा आहे. त्यामुळे स्पुटनिक व्ही पाठोपाठ जर स्पुतनिक लाइटलाही भारतात मंजुरी मिळाली तर लसीचा तुटवडा दूर होऊन लसीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे.

रशियाने स्पुतनिक लाइट कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने ही माहिती दिली आहे. मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. स्पुतनिक व्हीची ही दुसरी लस आहे आहे. ही लस कोरोनाविरोधात ७९.४% प्रभावी आहे. काही लशींच्या दोन डोसपेक्षाही प्रभावी या लशीचा एक डोस आहे, असे रशियाने सांगितले. या लसीच्या एका डोसशी किंमत १० डॉलर्स म्हणजे ७३७ रुपयांपेक्षाही कमी आहे.

सिंगल डोस स्पुटनिक लाइटचे ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान लसीकरण मोहिमेत ही लस वापरण्यात आली. लस दिल्यानंतर २८ दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस ७९.४% प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लसीचे तिसºया टप्प्यातील ट्रायल घेण्यात आले आहे. यात ७,००० लोकांचा समावेश होता. त्याचा अंतरिम निकाल या महिन्यानंतर येईल.

भारतात ‘लाइट’ला मान्यता मिळण्याची शक्यता
रशियाची सर्वात पहिली लस स्पुटनिक व्ही ९७.६% प्रभावी असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. या लसीला भारतात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील कोरोना लसीचा तुटवडा पाहता सिंगल डोस स्पुतनिक लाइटलाही भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

पक्ष्यांसाठी चिमुकल्यांनी उभारली पक्षीपाणपोई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या