30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयरशियाकडून युक्रेनला युद्धाची धमकी

रशियाकडून युक्रेनला युद्धाची धमकी

एकमत ऑनलाईन

कीव : पुतीन समर्थक रशियन टीव्ही वाहिनीवरून युद्धाची धमकी दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदेयमर जेलेन्स्की हे लष्करी गणवेशात सीमेवर दाखल झाले. त्याआधी एका रशियन वाहिनीवरून युक्रेन यु्द्धापासून रशिया फक्त एक पाऊल दूर असल्याची धमकी देण्यात आली. रशिया-युक्रेन सीमेवर तणाव असून रशियाने घातक आणि अत्याधुनिक शस्त्रांसह जवळपास ८० हजार सैन्य तैनात करण्यात आले आहेत.

रशियाने ८० हजार सैन्यांसह मोठ्या प्रमाणावर रणगाडे, तोफा, शस्त्रांनी सज्ज असलेली वाहने मोठ्या प्रमाणावर तैनात केले आहेत. त्यामुळेच रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींचे प्रवक्ते इउलिया मेंडल यांनी सांगितले की, युक्रेनचे ४० हजार सैनिक क्रिमीयामध्ये तैनात केले आहेत. तर, ४० हजार सैन्याला डोनबासमध्ये तैनात केले आहे. मेंडल यांनी सांगितले की, डोनबासमध्ये मागील वर्षी रशियन समर्थक फुटीरतावादी युक्रेनच्या सैन्यासोबत संघर्ष करत आहेत.

या तणावाच्या दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी रशियाला लागून असलेल्या सीमेवरील मारिउपोल भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी लष्कराचा गणवेश आणि हेल्मेट घातले होते. रशियाच्या धमकीसमोर झुकणार नसल्याचे संकेत युक्रेनच्या राष्ट्रपतींनी दिले. लष्कराला संपूर्ण राजकीय पाठिंबा आहे, याची माहिती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी सुरू असून आमचा देश या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास सज्ज आहे.

दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू होती
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील काही आठवड्यांपासून गोळीबार सुरू आहे. मागील काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांशी संघर्ष करताना दोन जवानांचा मृ्त्यू झाला आहे.

कोर्ट सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या