30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home आंतरराष्ट्रीय आर्मेनिया-अजरबैझानमध्ये रशियाची मध्यस्थी

आर्मेनिया-अजरबैझानमध्ये रशियाची मध्यस्थी

एकमत ऑनलाईन

मॉस्को : आर्मेनिया आणि अजरबैझान या दोन देशांमध्ये नागरोनो-काराबाख प्रदेशात सुमारे दोन आठवड्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हं आहेत. आर्मेनिया आणि अजरबैझान यांनी प्रथमच चर्चा करण्याचे मान्य केले आहे. रशियाच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देश चर्चेसाठी तयार झाले आहेत.

आर्मेनिया आणि अजरबैझान दोन्ही देश चर्चा करणार असून, चर्चेची तयारी सुरू झाल्याची माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी दिली. गुरुवारी रात्री आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशियान आणि अजरबैझानचे राष्ट्रपती इलहम अलियेव यांच्यासोबत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी फोनवरून चर्चा केली आहे.

पुतीन यांनी काराबाख संघर्ष संपुष्टात आण्याचे आवाहन केले असून, मृतदेह आणि कैद्यांचे हस्तांतरण करण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना रशियाची राजधानी मॉस्कोत आमंत्रित करण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या चर्चेत रशिया मध्यस्थी करणार आहे. या भागात २७ सप्टेंबर रोजी दोन्ही देशांदरम्यान संघर्ष निर्माण झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये १९९४ मध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर आता सुरू झालेले युद्ध गंभीर असल्याचे म्हटले जाते.

सीबीआयने स्विकारली हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाची सूत्रं

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या