23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home आंतरराष्ट्रीय रशियाची लस ठरली ९२ टक्के परिणामकारक

रशियाची लस ठरली ९२ टक्के परिणामकारक

‘स्पुतनिक व्ही’च्या १६ हजार लोकांवर यशस्वी चाचण्या

एकमत ऑनलाईन

मॉस्को : रशियाचे स्पुतनिक व्ही लस कोरोनापासून बचावासाठी ९२ टक्के परिणामकारक ठरल्याचे या देशाने सांगितले आहे. या लशीच्या चाचणीचे अंतरिम निकाल हाती आले असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने सांगितले आहे. याच संस्थेतर्फे कोरोना लसीचे जगभरात मार्केटिंग होत आहे.रशियाने स्पुतनिक व्हीची १६ हजार लोकांवर चाचणी केली. या लोकांना लसीचे दोन दोन डोस देण्यात आले होते.

या लशीला ११ ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला.रशियाची पहिली लस स्पुतनिक व्ही एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे.

रशियन वृत्तसंस्थेच्या मते रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेले नाही. रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेले नाही. रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे.

तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेले नाही. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलचा शेवटचा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे लसीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतातही स्पुटनिक व्ही लसीच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने या लसीच्या चाचण्यांची परवानगी घेतली होती.

सर्वांत मोठा गुंड कौन, यावरून खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या