22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसायना नेहवाल बाहेर

सायना नेहवाल बाहेर

एकमत ऑनलाईन

कपिला-अर्जुन, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत
टोकियो : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये कडवे आव्हान पेलल्यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली आहे.

सायना नेहवालला थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याकडून १७-२१, २१-१६ आणि १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. या विजयासह बुसाननचा सायनाविरुद्धचा विजयी विक्रम ५-३ वर गेला आहे. भारतीय पुरुष दुहेरीच्या जोडीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. ध्रुव कपिला व अर्जुन आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

बुसाननने सुरुवातीच्या गेममध्ये ११-३ अशी आघाडी घेत सायनाला दडपणाखाली ठेवले. तिस-या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. पण बुसाननने वेग पकडला आणि पाच गुणांची आघाडी घेतली. दुसरीकडे, सायना मागे राहिली आणि २६ वर्षीय बुसाननने सात मॅच पॉइंटसह आपले उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.

अर्जुन आणि कपिला या बिगरमानांकित जोडीने ५८ मिनिटांच्या रोमहर्षक लढतीत सिंगापूरच्या टेरी ही आणि लोह कीन हीन यांचा १८-२१, २१-१५, २१-१६ पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीने डेन्मार्कच्या जेप्पा बे आणि लासे मोल्हेडे यांचा ३५ मिनिटांत २१-१२, २१-१० असा पराभव केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या