34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसौदीने कच्च्या तेलाच्या किंमती वाढवल्या; भारताला बसणार मोठा फटका

सौदीने कच्च्या तेलाच्या किंमती वाढवल्या; भारताला बसणार मोठा फटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने क्रूड ऑईलच्याकिंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही भाववाढ फक्त आशिया खंडातील देशांसाठी असणार आहे. युरोपमधील राष्ट्रांवर याचा कोणताच परिणाम होणार नाही. असे असले तरी सौदी अरेबियाकडून तेल आयात कमी करण्याच्या भारताच्या योजनेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे संकेत मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने अधिकृत विक्री किंमत म्हणजे ओएसपीमध्ये २० ते ५० सेंट प्रति बॅरल वाढ केली आहे. क्रूड ऑईलच्या वेगवेगळ्या ग्रेडनुसार ही वाढ करण्यात आली आहे. सौदी अरेबिया दर महिन्याला ओएसपीमध्ये बदल करतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियाई देशांनी क्रूड ऑईलच्या किंमतीत कपात करण्याचे संकेत दिले आहेत. सौदी अरेबियातून क्रूड ऑईलची कमी आयात करावी, अशा सूचना भारत सरकारने सरकारी तेल कंपन्यांना दिल्या आहेत. क्रूड ऑईलच्या भाववाढीमुळे भारत आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांत तणाव निर्माण होऊ लागला आहे. तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी क्रूड ऑईल उत्पादक देशांनी उत्पादनावरील बंदी उठवावी अशी भूमिका भारताने घेतली होती, परंतु ओपेक प्लस देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. भारताने स्वस्त दरात खरेदी केलेल्या क्रूड ऑईलचा वापर करावा, असे सौदी अरेबियाचे तेलमंत्री अब्दुल एजाज बिन यांनी म्हटले होते.

भारतावर नकारात्मक परिणाम
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (चलन आणि ऊर्जा संशोधन) अनुज गुप्ता म्हणाले की, सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा भारतावर नकारात्मक परिणाम होईल. भारत जवळपास ८५ टक्के क्रूड ऑईल इतर देशांकडून आयात करतो. त्यातील बराच मोठा वाटा सौदी अरेबियाचा आहे. सौदीने किंमती वाढवल्यामुळे आता जास्त पैसे देऊन क्रूड ऑईल खरेदी करावे लागणार आहे. साहजिकच पेट्रोल-डिझेलच्याकिंमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सौदीकडून भारत क्रूड ऑईलची कमी खरेदी करण्याच्यादृष्टीने काम करत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार?
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, लवकरच पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमती कमी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यास आम्ही ग्राहकांना त्याचा पूर्ण लाभ देऊ. सध्या क्रूड ऑईलच्या किंमती ६३ डॉलर प्रति बॅरल एवढ्या आहेत.

अनिल देशमुख दिल्लीला रवाना; सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या