23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयआर्थिक संकटामुळे श्रीलंकेत शाळा बंद

आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत शाळा बंद

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या श्रीलंकेतील नागरिकांसाठी पुरेसे इंधन उपलब्ध नाही.

दरम्यान, आता देशात वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेच्या मंत्र्यांनी सांगितले, शाळा बंद असल्याच्या कालावधीतील अभ्यासक्रमाचा समावेश पुढील अभ्यासक्रमात करण्यात येईल.

गेल्या महिन्यातही इंधनाअभावी ग्रामीण भागातील शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर गेल्या दोन आठवड्यांपासून देशभरातील शहरी भागात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या