18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeआंतरराष्ट्रीयचीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना! प्रकरण दाबण्यात जागतिक आरोग्य संघटनेचा हात

चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना! प्रकरण दाबण्यात जागतिक आरोग्य संघटनेचा हात

एकमत ऑनलाईन

बीजिंग (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णाच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत असताना काही दिवसांपूर्वी चीनमधून पलायन केलेल्या वैज्ञानिकाने मोठा खुलासा केला होता. चीनमधील हाँगकाँग शहरातील हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे जेष्ठ वायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग यान यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत धक्कादायक खुलासा केला असून व्हायरस हा चीनच्या मिलिट्री लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता यामध्ये जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ) चा देखील हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चीनने कोरोना प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा देखील हात असल्याचा आरोप आता डॉ. ली मेंग यान यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. वुहानमध्ये हा व्हायरस समोर आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र चीनने हे प्रकरण दाबण्यासाठी एक कव्हर-अप ऑपरेशन सुरू केलं. लोकांना याबाबत माहिती मिळण्याआधी चीनी सरकारला याचा अंदाज होता. जागतिक आरोग्य संघटना देखील या प्रकरणाच्या ‘कव्हर अप’चा भाग असून हे प्रकरण दाबण्यात जागतिक आरोग्य संघटनेचा हात असल्याचा आरोप यान यांनी आता केला आहे.

‘चिनी सरकार आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिमा मलीन करत आहे. सायबर अटॅक करण्यात येत असून कुटुंबीयांना धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे’ असा दावा देखील मुलाखतीत डॉ. ली मेंग यान यांनी केला आहे. जीवघेणा कोरोना व्हायरस चीनच्या वेट मार्केटमधून पसरल्याचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ताइवानी वृत्तसंस्थेला माहिती देताना लाईव्ह स्ट्रीमदरम्यान डॉ ली मेंग यान यांनी ‘ही माहामारी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून मी विश्लेषण सुरू केले होते की, चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या मिलिट्री प्रयोगशाळेतून हा व्हायरस पसरला होता. ही बाब लपवण्यासाठी वुहानच्या वेट मार्केटची कहाणी रचण्यात आली. वरिष्ठ अधिकारीवर्गाने ही बाब अजुनही गांभीर्याने घेतलेली नाही’ असं सांगितलं होतं.

‘चिनी कम्युनिस्ट पार्टीविरुद्ध बोलल्यानंतर आम्हाला कधीही तडीपार केलं जाऊ शकतं. सध्या हाँगकाँगमध्ये लोकशाहीच्या समर्थकांसोबत हा प्रकार केला जता आहे. त्यामुळे मी माहिती गोळा करण्यास सुरूवात केली.’

वायरोलॉजिस्ट डॉ ली मेंग यान एप्रिल महिन्यात अमेरिकेत आल्या. कारण त्यांना चीनी सरकारकडून अटक होण्याची भीती होती. चिनी सरकारला बरखास्त करण्यासाठी चीनच्या स्थानिक लोकांनी मदत करण्याचं काम सुरू ठेवणार असल्याचं देखील म्हटलं होतं. त्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेचा यामध्ये हात असल्याचा दावा केला आहे.

लोहा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारानी दिले कोविड सेंटर साठी 100 बेड

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या