21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीय२० भारतीय मालमत्ता जप्त करा

२० भारतीय मालमत्ता जप्त करा

एकमत ऑनलाईन

पॅरिस : फ्रान्सच्या कोर्टाने भारत सरकारबरोबरच्या नुकसानभरपाई वसुलीच्या वादात ब्रिटनच्या केर्न एनर्जी कंपनीच्या बाजूने निकाल दिला आहे. फ्रान्समधील कोर्टाच्या आदेशानुसार ब्रिटनच्या केर्न एनर्जीने फ्रान्समधील २० भारतीय सरकारी मालमत्ता जप्त करण्याचे लवाद आदेश मिळवले आहेत. ११ जून रोजी फ्रेंच कोर्टाने केर्न एनर्जीला भारतीय सरकारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहे ज्यामध्ये बहुतेक घरे आहेत. या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया बुधवारी संध्याकाळी पूर्ण झाली.

या प्रकरणात थेट सामील असलेल्या तीन लोकांनी सांगितले की यापैकी बहुतेक मालमत्ता घरे असून त्यांची किंमत २० दशलक्ष युरोपेक्षा जास्त आहे आणि भारत सरकार फ्रान्समध्ये याचा वापर करत आहे. ११ जून रोजी फ्रेंच कोर्टाने ट्रिब्यूनल ज्युडीसियर डी पॅरिसने केर्नच्या अर्जावर पॅरिसमध्ये असलेल्या भारत सरकारच्या मालकीची निवासी संपत्ती जप्त करण्याचा निर्णय दिला होता. बुधवारी सायंकाळी यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्याची सूत्रांनी सांगितले.

भारतीय अधिका-यांना काढून टाकण्याची शक्यता कमी
या मालमत्तांमध्ये राहणा-या भारतीय अधिका-यांना केर्नकडून काढून टाकण्याची शक्यता नसली तरी कोर्टाच्या आदेशानंतर भारत सरकार त्यांना विकू शकत नाही. आंतरराष्ट्रीय लवादात एका कोर्टाने डिसेंबरमध्ये भारत सरकारला केर्न एनर्जीला १२० कोटी डॉलरची भरपाई (साधारण ८,८०० कोटी रुपये) अधिक व्याज व खर्चासहित १७२.५ कोटी डॉलर (साधारण १२,६०० कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले होते. भारत सरकारने या आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतर केर्न एनर्जीने १.४ अब्ज डॉलर वसुलीकरिता अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांच्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची प्रक्रियाही सुरू केली.

लॅम्बडा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही जास्त धोकादायक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या