24.9 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयWHO चे प्रमुख झाले सेल्फ क्वॉरन्टाईन

WHO चे प्रमुख झाले सेल्फ क्वॉरन्टाईन

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. या कोरोनापासून कोणाचीही सुटका नाही असच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी स्वत: क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांनी हा घेतला निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मी सेल्फ क्वारंटाईन केलं आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. “मी एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्यामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे” असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

ऑक्टोबरमध्ये १ लाख ५ हजार कोटी जीएसटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या