23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयवाघ, सिंह, मांजर विकणे आहे..!

वाघ, सिंह, मांजर विकणे आहे..!

एकमत ऑनलाईन

गरिबीमुळे पाकिस्तानवर प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचा लिलाव करण्याची वेळ
इस्लामाबाद : पाकिस्तानला आर्थिक संकटांची चाहूल लागली असून पैसे नसल्याच्या कारणावरून प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना विकण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे.

लाहोर येथील प्राणिसंग्रहालयातील वाघ, सिंह, मांजर असे प्राणी पाकिस्तानने विक्रीला काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची बिकट परिस्थिती जगासमोर यायला हळूहळू सुरूवात झाली आहे.

पाकिस्तानातील प्रचंड महागाई आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीचा परिणाम फक्त नागरिकांवरच नाही, तर प्राण्यांवरही होत असल्याचे समोर आले आहे. लाहोर येथील प्राणिसंग्रहालयाच्या अधिका-यांनी प्राण्यांना खायला घालायला पैसे नसल्यामुळे तेथील सिंह विक्रीला काढले आहेत. त्याबरोबरच मोठे मांजर, सिंह आणि वाघांचाही लिलाव होणार आहे. खासगी संस्थांना हे प्राणी विकले जाणार असून त्यामुळे पैसा आणि जागा वाचेल असे मत प्राणिसंग्रहालयाच्या अधिका-यांनी सांगितले आहे.

लाहोर येथील प्राणिसंग्रहालयात २ ते ५ वर्ष वयाचे २९ सिंह आहेत. त्यातील १२ सिंहाचा येत्या ११ ऑगस्टला लिलाव होणार असल्याचे लाहोर येथील प्राणी संग्रहालयाचे उपाध्यक्ष अहमद जनजुआ यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर ६ चित्ता आणि २ बिबट्या प्राणिसंग्रहालयात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या