25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानमध्ये मुलींसाठी वेगळी शाळा

अफगाणिस्तानमध्ये मुलींसाठी वेगळी शाळा

एकमत ऑनलाईन

काबूल : अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर महिलांबाबत या राजवटीचे धोरण काय असेल याबाबत उत्सुकता होती. त्यातही महिला शिक्षणाबाबत तालिबान राजवट कोणते निर्णय घेते याबाबतही उत्सुकता होती. आता तालिबान राजवटीने आपले महिला शिक्षणविषयक धोरण जाहीर केले असून आगामी कालावधीमध्ये महिलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

याचाच अर्थ अफगाणिस्तानमध्ये आता मुले आणि मुली एकत्र शिक्षण घेऊ शकणार नाहीत. तालिबान राजवटीने महिला शिक्षणाबाबत धोरण ठरविण्यासाठी एक समिती स्थापन केली असून अब्दुल हकीम शराही नावाची व्यक्ती या समितीचे नेतृत्व करत आहे.

या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला असून त्यामध्ये महिलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी वेगळी यंत्रणा असावी असे सुचवले आहे शिवाय या महिलांच्या शिक्षणसंस्था वेगळ्या असल्या तरी त्यासाठी वेगळे नियमही करण्यात आले आहेत त्याप्रमाणे इयत्ता सहावीपेक्षा मोठ्या वर्गात शिकणा-या सर्व विद्यार्थिनींना हिजाब परिधान करावा लागणार आहे.

त्या शाळेतील सर्व शिक्षिकांना आणि कर्मचा-यांनाही आपला चेहरा झाकून घ्यावा लागणार आहे. शाळेच्या कामकाजाच्या वेळात फक्त महिलांना शाळेत प्रवेश दिला आहे. मुलगी घरातून शाळेकडे जात असताना रस्त्यात कोठेही थांबणार नाही. घरातून निघाल्यानंतर ती थेट शाळेत जाईल आणि शाळा सुटल्यावर पुन्हा थेट घराकडे जाईल. रस्त्यामध्ये ती कोणाशीही बोलणार नाही असाही नियम करण्यात आला आहे. महिला शिक्षणाबाबत तालिबान्यांनी असे कडक नियम केले असले तरी महिलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या