32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home आंतरराष्ट्रीय ऍपबंदीवर चीनकडून गंभीर आरोप

ऍपबंदीवर चीनकडून गंभीर आरोप

एकमत ऑनलाईन

बीजिंग : भारताकडून अजून ४३ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर चीन संतापला आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिनी ऍप्सवर घातलेली बंदी ही जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचे उल्लंघन करणारी आहे असे चीनने म्हटले आहे. भारताने मंगळवारी चीनच्या आणखीन ४३ ऍप्सवर बंदी घातली.

गलवान खो-यामध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षानंतर भारताने अशाप्रकारे चौथ्यांदा चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे. आतापर्यंत भारताने एकूण २६७ ऍप्सवर बंदी घातली आहे. भारत वारंवार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ऍप्सवर बंदी घालत असल्याचा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला आहे.

चिनी प्रवक्त्या जी रोंग यांनी भारताच्या निर्णयाचा विरोध ऍप्सवर बंदी घालण्यासाठी वारंवार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असून चीन याचा विरोध करत आहे. भारत सर्व देशांना नि:पक्षपातीपणे व्यवसायासाठीची बाजारपेठ उपलब्ध करु देईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व इक्वट्रीशीयन स्पोर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे अश्व प्रदर्शन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या