33.3 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home आंतरराष्ट्रीय गंभीरच ! अफगाणिस्तानच्या ५० टक्के भुभागावर तालिबानचे वर्चस्व

गंभीरच ! अफगाणिस्तानच्या ५० टक्के भुभागावर तालिबानचे वर्चस्व

एकमत ऑनलाईन

काबुल : अफगाणिस्तान हा भारताचा शेजारी देश कायम हिंसाचारग्रस्त राहिला आहे. आधी रशिया, मग अमेरिका व त्यानंतर तालिबान अशा संकटांमुळे हा देश कायम युद्धग्रस्त देश म्हणून जगात बदनाम झाला आहे. त्यातच आता आणखी गंभीर बाब अशी की अमेरिकेच्या इतक्या प्रयत्नांनत्ांरही या देशातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक भागावर मुलतत्ववादी व अतिरेकी संघटना तालिबानचेच वर्चस्व आहे. तर अफगाण सरकारच्या ताब्यात केवळ ४८ टक्केच क्षेत्र आहे.

अफगाणिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी नुकतेच याबाबत एक सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात ही माहिती उघडकीस आली आहे. सर्वेक्षणानूसार तालिबानने जवळपास ५२ टक्के भुभागावर कब्जा मिळवलेला असून सरकारकडे फक्त ४८ टक्के भुभागच आहे. एवढेच नव्हे तर तालिबानचा दावा असाही आहे की उर्वरीत ४८ टक्के भागातीलही ७० टक्के भागातील सरकारही आपल्याच इशाºयानूसार चालते. म्हणजे एकंदरीतच अफगाणिस्तानवर अजुनही इस्लामी मुलतत्ववादी अतिरेक्यांची मजबुत पकड आहे. परिणामी या देशातील तसेच भारतीय उपखंडातील शांततेलाही दहशतवादाचे ग्रहण लागलेले लवकर सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

विशेष म्हणजे अमेरिकेने गेल्यावर्षी अफगाणिस्तानातील सातत्याने होणारी त्यांच्या सैनिकांची हानी पाहता त्या देशातून काढता पाय घेतला आहे. दुसरीकडे अफगाण सरकारची सैनिकी ताकद इतकी प्रबळ नाही की ती तालिबान्यांना संपवू शकते. अशातच मोदी सरकारच्या काळापासून भारताने गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानमध्ये आपली गुुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलही या तालिबान्यांनी नाराजी व्यक्त करीत काहीवेळा अफगाणिस्तानातील भारतीय दुतावासावर हल्लेही केले आहेत. एवढेच नव्हे तर अफगाणिस्तानातील वारंवार अशांततेमुळे मोठ्या संख्येने अफगाणी मुसलमान भारतात राजधानी दिल्लीत निर्वासित म्हणून जीवन जगत आहेत. परिणामी अफगाणिस्तानातील अशांतता भारतासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.

 

आमची बदनामी बंद करा, नाही तर मी आत्महत्या करेन; पूजाच्या वडिलांचा आक्रोश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या