मॉस्को: मद्यपींची पिण्याची हौस न पुर्ण झाल्यास ते काय करतील याचा नेम नसतो. जगभरात कोणत्याही देशातील मद्यपी हे अक्षरक्ष: अवलियेच असतात. रशियातील एका गावातील मद्यपींना मात्र नसता खटाटोप जीवावर बेतला आहे. यामद्यपींना रंगात आलेल्या पार्टीत दारू संपल्यामुळे हॅण्ड सॅनिटायझर प्राशन केले. मात्र त्यामुळे सातजणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघेजण कोमात आहेत.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात ९ जण पार्टी करत होते. पार्टीतील दारू संपल्यानंतर त्यांनी हॅण्ड सॅनिटायझर प्यायले. यामध्ये ६९ टक्के मिथेनॉल होते. यातील एका महिलेसह तिघांचा तत्काळ मृत्यू झाला. तर, उर्वरित सहाजणांना विमानातून याकुत्स्क शहरात नेण्यात आले. मात्र तेथेही चौघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण कोमामध्ये आहेत.