22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

चीनमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

एकमत ऑनलाईन

सिचुआन : चीनच्या सिचुआन प्रांताच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला, असे चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले आहे.

सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या आग्नेयेला सुमारे ४३ किलोमीटर (२६ मैल) १० किलोमीटर खोलीवर भूकंप झाला, असे यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे. सिचुआनची राजधानी चेंगडूच्या नैऋत्येस सुमारे १८० किमी (१११ मैल) अंतरावर याचे धक्के जाणवले आहेत. केंद्राने सांगितले की, भूकंपाचे केंद्र लुडिंग शहरात १६ किलोमीटर खोलीवर होते. चांगशा आणि शियानसारख्या दूरच्या नेटिझन्सनी सांगितले की त्यांना सिचुआनमधील भूकंपाचे धक्के जाणवले.

काही मिनिटांनंतर, केंद्रानुसार लुडिंगजवळील यान शहराला ४.२ तीव्रतेचा दुसरा भूकंप बसला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. २०१३ मध्ये, यानला जोरदार भूकंपाचा धक्का बसला, १०० हून अधिक लोक ठार झाले आणि हजारो जखमी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या