23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनेपाळच्या पंतप्रधानपदी शेर बहादूर देऊबा

नेपाळच्या पंतप्रधानपदी शेर बहादूर देऊबा

एकमत ऑनलाईन

काठमांडू : नेपाळी काँग्रेस अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी कलम ७६ (५) अंतर्गत त्यांची नियुक्ती केली आहे. मंगळवार दि़ १३ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांचा शपथविधी पार पडला़

दुसरीकडे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. आमचा पक्ष सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे मान ठेवतो, असे त्यांनी राजीनामा देताना सांगितले. नेपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

पाच महिन्यांपूर्वी दोन वेळा संसद बरखास्त करण्यात आली होती. अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांचा संसदेचे प्रतिनिधिगृह बरखास्त करण्याचा निर्णय हा पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या शिफारशीनुसार असला तरी तो घटनाबाह्य आहे. असा निकाल पाच सदस्यांच्या घटनात्मक पीठाचे प्रमुख न्या. चोलेंद्र शमशेर राणा यांनी असा निकाल दिला होता.

मेमध्येच यूपीत होणार होते स्फोट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या