24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनला झटका : भारताने ४४ ट्रेनची निविदा केली रद्द

चीनला झटका : भारताने ४४ ट्रेनची निविदा केली रद्द

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने आणखी एक झटका दिलला आहे. केंद्राने सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनची निविदा रद्द केली आहे. ४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी काही निविदा आल्या होत्या. यामध्ये चीनी कंपनीशी संबंधीत एका कंपनीने निविदा केली होती. यामुळे रेल्वे मंत्रालयाने ४४ ट्रेनची निविदा रद्द केली. रेल्वे मंत्रालय पुढील आठवड्यात नव्याने निविदा मागवणार आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतीय कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी काही कंपन्या स्पर्धेमध्ये होत्या. यामध्ये एक विदेशी कंपनी देखील होती. मात्र, Pioneer Fil-Med Pvt Ltd या कंपनीत चीनी कंपनी CRRC Yongji Electric Company Ltd भागीदार आहे. यामुळे रेल्वे मंत्रालयाने ४४ ट्रेनची निविदा रद्द केली आहे. चीनमधील CRRC Yongji Electric Company Ltd आणि गुरुग्राम येथील Pioneer Fil-Med Pvt Ltd यांनी २०१५ मध्ये एकत्रित ही कंपनी सुरु केली होती.

राष्ट्रपती,पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत ही माहिती दिली. “४४ सेमी हाय स्पीड ट्रेनच्या (वंदे भारत) निर्मितीचं कत्राट रद्द करण्यात आलं आहे. एका आठवड्यात ऑर्डर काढून नव्यानं कंत्राट मागवले जातील. यामध्ये मेक इन इंडियाला प्राधान्य असेल.” असे ट्विट रेल्वे मंत्रालयाने केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या