25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत फेडेक्स सेंटरवर गोळीबार; ४ शीख बांधवांसह ८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत फेडेक्स सेंटरवर गोळीबार; ४ शीख बांधवांसह ८ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

वाशिंग्टन : अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका फेडेक्स सेंटरवर का व्यक्तीने गोळीबार केला. हल्ल्यात भारतीय वंशाच्या ४ शीख बांधवांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हल्लेखोर तरुण ब्रँडन स्कॉट याने स्वत: वरही गोळी झाडली. ब्रँडन स्कॉट हा इंडियानातील रहिवासी आहे. गोळीबारामागचं नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित हल्लेखोर फेडेक्सचा पूर्व कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.

इंडियाना राज्यातील संबंधित फेडेक्स सेंटरमध्ये डिलिव्हरी सेवा देण्याचे काम करणाºया लोकांमध्ये ९० टक्के लोक भारतीय- अमेरिकन आहेत. यातील बहुतांश कर्मचारी स्थानिक शीख समुदायातील आहेत. वृत्तानुसार, संबंधित हल्लेखोर आरोपी ब्रँडन स्कॉट पूर्वी फेडेक्सच्या सेंटरमध्ये काम करत होता. मॅरियन काऊंटी कोरोनरच्या कार्यालयाने मृतांची ओळख पटवली आहे.

पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० सभांवर बंदी!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या