22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजोहान्सबर्ग बारमध्ये गोळीबार; १४ जण ठार

जोहान्सबर्ग बारमध्ये गोळीबार; १४ जण ठार

एकमत ऑनलाईन

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये हा गोळीबार झाला.

पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली होती. येथे काही लोकांचा एक गट मिनिबस टॅक्सीत आला आणि बारच्या रक्षकांवर गोळीबार केला. घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरूनही गोळीबारात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे दिसून येते असे गौतेंग प्रांताचे पोलिस आयुक्त लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी सांगितले. ज्या बारमध्ये गोळीबार झाला तो परवानाधारक आहे. घटनेच्या वेळी येथे अनेक लोक उपस्थित होते. अचानक हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. मात्र, आरोपींच्या गोळीबारामागील हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही, असेही पोलिस कर्मचारी इलियास मावेला यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या