23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयस्माईल प्लीज, लेक हो हसा...? स्थानिक प्रशासनातील कर्मचा-यांसाठी नवे धोरण...

स्माईल प्लीज, लेक हो हसा…? स्थानिक प्रशासनातील कर्मचा-यांसाठी नवे धोरण…

एकमत ऑनलाईन

मनिला : हसत-खेळत आयुष्य जगले पाहिजे, असे सांगितले जाते. मग तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा घरी. तुम्ही हसायलाच पाहिजेत. आता या विषयी नुकताच एक कायदा पारित करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचा-यांना कार्यालयात हसण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासोबतच या कायद्यात हे पण सांगितले आहे की, कर्मचारी जर हसले नाहीत तर त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावा. वास्तविक हा आदेश स्थानिक पातळीवर फिलिपाइन्सच्या महापौरांनी काढला आहे. या कायद्यात असे सांगितले आहे की, प्रशासनातील कर्मचा-यांना कार्यालयात हसत-हसत काम करावे लागणार आहे. तसे न करणा-या कर्मचा-यांना दंड होऊ शकतो

न्यू स्ट्रेट टाईम्सच्या वृत्तानुसार, महापौर अरिस्टॉटल अगुरी यांनी काढलेल्या या कायद्याचे नाव ‘स्माईल पॉलिसी’ असे आहे. ज्या कायद्यामध्ये कर्मचा-यांना हसत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापौरांना स्थानिक प्रशासन स्तरावर सेवा सुधारायच्या आहेत.

जेव्हा लोक आपल्या कामासाठी कार्यालयात येतात तेव्हा त्यांना आनंदाचे वातावरण मिळावे, अशी महापौरांची प्रामाणिक इच्छा आहे. महापौर अ‍ॅरिस्टॉटल अगूरी यांना कर्मचा-यांच्या दृष्टिकोनात बदल घडवायचा आहे. त्यांनी लोकांच्या स्थानिक पातळीवर येणा-या तक्रारी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. अरिस्टॉटल अगुरी यांनी या महिन्यात लुझोन बेटाच्या क्वेझॉन प्रांतातील मूलॉने शहराच्या महापौराचा पदभार स्वीकारला आहे.

६ महिन्यांची पगार कपात शक्य
या कायद्याचे पालन न करणा-या कर्मचा-यांचा ६ महिन्यांचा पगार कापला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे कर्मचा-यांना सांगितले आहे. आणि या कायद्याची पुढची पायरी म्हणजे कर्मचा-यांना नोकरीतून निलंबितही केले जाऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या