22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयतर स्वत:चे कपडे विकून लोकांना पिठ पुरविणार

तर स्वत:चे कपडे विकून लोकांना पिठ पुरविणार

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी आता महागाईविरोधात मुख्यमंर्त्यांना अल्टिमेटम दिला आहे. गव्हाच्या पीठाचे दर तात्काळ कमी करा नाहीतर मी माझे कपडे विकून लोकांना गव्हाचं पीठ पुरवेन, असा सज्जड दम शहबाझ शरीफ यांनी भरला आहे. ठकारा स्टेडियममध्ये काल आयोजित केलेल्या बैठकीत शरीफ बोलत होते.

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांना शहबाझ शरीफ यांनी अल्टिमेटम दिला आहे. जर गव्हाच्या पीठाचे दर पुढच्या २४ तासांत ४०० रुपयांवरून १० रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाले नाहीत तर, मी माझे कपडे विकेन आणि स्वत:ला लोकांना स्वस्त पीठ उपलब्ध करून देईन, असे शरीफ म्हणाले आहेत. पंतप्रधानांच्या या भाषणामुळे या सार्वजनिक बैठकीतले वातावरण चांगलेच तापले. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही शरीफ यांनी टीका केली आहे. इम्रान खान यांनी देशाला उच्चांकी महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली, असे म्हणत शरीफ यांनी टोला लगावला आहे. पाकिस्तानमध्ये सातत्याने वाढणा-या इंधन दरांसाठीही त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाच जबाबदार धरले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या