31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home आंतरराष्ट्रीय सोशल मीडियाचा अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला

सोशल मीडियाचा अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : युरोपीय संघटनेतील पोलादी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणा-या जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंपन्यांना चांगलेच झापले. अभिव्यक्ति स्वातंत्र्य निश्चित करु शकत नाहीत, असा टोला मर्केल यांनी लगावला आहे. विचारांचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे आणि कोणत्याही किंमतीत त्याला बाधा पोहचता कामा नये. बोलण्याच्या स्वातंत्र्यावर कायदा किंवा काद्यामध्ये स्पष्ट केलेल्या भाषेनुसारच त्यावर निर्बंध घालता येतील. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्डोगन यांनी यापूर्वीच व्हॉट्सअ­ॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा केली आहे.

नुकतीच व्हॉट्सअ­ॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी म्हणजेच खासगी माहितीसंदर्भात धोरणामध्ये बदल केला. या नवीन धोरणांमधील अटी मान्य नसतील तर यूझरचे अकाऊंट डिलीट केले जाईल असे व्हॉट्सअ­ॅपने सांगितले आहे. व्हॉट्सअ­ॅपच्या या नवीन अटी आणि धोरणांसाठी मंजुरी दिल्यानंतर यूझर्सची संपूर्ण खासगी माहिती फेसबुकबरोबरच कंपनीच्या इतर फ्लॅटफॉर्मवर शेअर केली जाईल. मात्र यामुळे अनेक युझर्स आपल्या खासगी माहितीसंदर्भात चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर तसेच फेसबुक अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर जगभरामध्ये सोशल नेटवर्किंग साईटवरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घात जात असल्याचा आरोप होताना दिसत आहे. अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईटने ट्रम्प यांच्या अकाऊंटवर घातलेल्या बंदीचा विरोध केला आहे. मात्र काहींनी या बंदीचे समर्थन केले आहे. भविष्यात होणारी हिंसा थांबवण्यासाठी ही बंदी योग्यच असल्याचे बंदीचे समर्थन करणाºयांनी व्यक्त केले होते़ दुसरीकडे व्हॉट्सअ­ॅपच्या प्रायव्हसी सेटींगवरुन चांगलाच वाद रंगला आहे. युझर्सची खासगी माहिती कंपन्यांच्या ताब्यात जाणार असल्याची टीका व्हॉट्सअ­ॅपवर केली जात आहे.

लडाखमध्ये थंडीचा कहर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या