लंडन : स्पेस पर्यटन क्षेत्रातील कंपनी व्हर्जिन गलॅक्टिकने सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी इंजिन उत्पादक रोल्स रॉयससोबत भागीदारी जाहीर केली. आवाजाच्या वेगापेक्षा तीनपट जलद वेगाने उड्डाण करणारी सुपरसॉनिक व्यावसायिक विमाने बनवण्यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत.
माच ३ च्या वेगाने हे विमान उड्डाण करेल. यापूर्वी कॉनकोर्ड विमाने माच २ च्या वेगाने उड्डाण करायची. १९७६ ते २००३ पर्यंत ही विमाने सेवेमध्ये होती. कुठलेही नवीन सुपरसॉनिक विमान बनवताना कॉनकोर्ड विमानाच्या बाबतीत आवाज आणि इंधनची जी समस्या होती, ती अडचण सोडवावी लागेल.
थर्मल मॅनेजमेंट, देखभाल, आवाज, उत्सर्जन ही या माच ३ विमानाच्या निर्मितीमधील आव्हाने आहेत. त्याशिवाय आर्थिक गणित म्हणजे कुठल्या मार्गावर ही विमाने परवडतील यावर व्हर्जिन गलॅक्टिक्सची टीम अभ्यास करणार आहे. व्हर्जिन गलॅक्टिक्सने या विमानासाठी इंजिन निर्मिती करण्यासाठी रोल्स रॉयससोबत एक सामंजस्य करार केला आहे.
अप्रतिम प्रवासाच्या अनुभवासाठी नवी संकल्पना
नव्या हायस्पीड विमानाची प्राथमिक डिझाइन सार्वजनिक करण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक्त आहोत. ग्राहकांना सुरक्षित, कुठलीही चिंता न करता अप्रतिम हवाई प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे व्हर्जिन गलॅक्टिक्सचे मुख्य स्पेस अधिकारी जॉर्ज व्हाइटसाइडस म्हणाले.
Read More निवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजना लाभधारकांना राष्ट्रीयकृत बँका घरपोच सेवा देणार