27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसीरमच्या डोसचे लसीकरण दक्षिण आफ्रिकेने थांबवले

सीरमच्या डोसचे लसीकरण दक्षिण आफ्रिकेने थांबवले

एकमत ऑनलाईन

केपटाऊन : जगभरातील बहुतांश देशात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. भारताने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला जगभरातून मागणी येत आहे. अशातच भारताने अनेक देशांना कोरोना लसीचे लाखो डोस पुरवले आहे. भारताकडून ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचे डोसही पाठवण्यात आले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचा वापर थांबवला आहे.

देशातील शास्त्रज्ञ ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीबाबत योग्य सल्ला, सूचना देत नाही, तोपर्यंत या लसीचा वापर थांबवण्यात येत आहे, असे दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री ज्वेली मिखाइज यांच्याकडून सांगण्यात आले. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका या लसीच्या ट्रायलचा डेटा समोर आल्यानंतर सरकारकडून ही निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे.

गंगा, उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्पांच्या कायमच विरोधात – उमा भारतींची स्पष्टोक्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या