24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइलॉन मस्कविरोधात बोलल्याने कर्मचा-यांना कामावरुन काढले

इलॉन मस्कविरोधात बोलल्याने कर्मचा-यांना कामावरुन काढले

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : इलॉन मस्क कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. सध्या इलॉन मस्कच्या विरोधात बोलणा-या कर्मचा-यांना ‘स्पेसएक्स’ने कामावरून काढून टाकले. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

इलॉन मस्क यांच्या गैरवर्तनावर टीका करणारे एक खुले पत्र लिहिण्यात आले होते आणि ते प्रसारित करण्यात होते. याला कामगारांचा पाठिंबा होता असे समोर आले त्यानंतर शुक्रवारी ‘स्पेसएक्स’ने कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले. तेथील कर्मचा-यांंचा हवाला देऊन न्युयॉर्क टाईम्सने या घटनेला दुजोरा दिला.

स्पेसएक्सचे अध्यक्ष ग्वेन शॉटवेल यांनी ईमेल पाठवून सांगितले की, कंपनीने या पत्राची चौकशी केली आहे आणि संबंधित कर्मचा-यांंना कामावरुन काढून टाकले. मात्र किती कामगारांना काढण्यात आले आहे, याचा अद्याप आकडा समोर आलेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या