22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरिया आणि अयोध्येचे विशेष नाते

कोरिया आणि अयोध्येचे विशेष नाते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे राजदूत शिन बोंग-किल यांनी अयोध्येसंदर्भात एक महत्वाचे वक्तव्य केलं आहे. बोंग-किल यांनी अयोध्या आणि कोरियाचे ऐतिहासिक नाते असल्याचा संदर्भ दिला आहे. कोरियामधील एका प्राचीन ऐतिहासिक पुस्तकामध्ये अयोध्येमधील एका राजकुमारीने कोरियामधील राजा किम सुरो याच्याशी लग्न केले होते, असा उल्लेख सापडतो, असे म्हटले आहे.

या राज्याच्या थडग्यामध्ये पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनामध्ये अयोध्येशी संबंधित कलाकृती सापडल्याचेही बोंग-किल यांनी म्हटले आहे. इसवी सन ४८ मध्ये अयोध्येची राजकुमारी सुरीरत्न ही कोरियामध्ये गेली होती. येथील राजकुमार किम सूरो याच्याशी लग्न केल्यानंतर सुरीरत्न हे नाव बदलून तिचे नाव हवांग ओके ठेवण्यात आले. सुरीरत्न ही समुद्र मार्गाने कोरियाला गेली होती. अयोध्येमधून निघताना सुरीरत्नने स्वत:बरोबर एक मोठी शिळा (दगड) नेली होती. समुद्रामध्ये नाव स्थीर रहावी म्हणून सुरीरत्न हा मोठा दगड घेऊन गेली होती, असे सांगण्यात येते. हा दगड नंतर तिच्या पगोडामध्ये स्मृतीचिन्ह म्हणून जपून ठेवण्यात आल्याचे अख्यायिका आहे.

काशी हिंदू विश्वविद्यालयामधील इतिहास विभागाचे प्राध्यापक अतुल कुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी कथांमध्येही याचा उल्लेख सापडतो. चिनी कथांनुसार अयोध्येच्या राजाला रात्री स्वप्न पडले़ ज्यामध्ये त्याला राजकुमारीचे लग्न कोरियाच्या राजकुमाराशी करण्यासंदर्भातील संकेत मिळाले. हवांग ओके आणि किमसूरो दोघे दिडशे वर्ष जगल्याचे सांगितले जाते.

हे दोघेही दक्षिण कोरियामधील प्रमुख राजा-राणी मानले जातात, असे म्हणतात की या देशातील १० टक्के लोकसंख्याचे मूळ वंशज हे दोघे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दोघांना दक्षिण कोरियामध्ये विशेष महत्व आहे. प्राचीन संबंधांबाबत वाजपेयी यांनी केले होते प्रयत्न भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना २००१ साली अयोध्या आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील संबंधांचा शोध घेण्यासंदर्भात प्रयत्न केले होते.

या दोन्ही ठिकाणांमधील ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकून त्याच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा वाजपेयी यांचा हेतू होता. भारतातूनच बौद्ध धर्माचा कोरियामध्ये प्रसार भारतामधूनच बौद्ध धर्माचा कोरियामध्ये प्रसार झाला, असे प्राध्यापक त्रिपाठी सांगतात. एकमेकांपासून चार हजार ३०० किमीवर असणा-या कोरिया आणि भारत या देशांमध्ये प्राचीन काळापासून संबंध आहेत.

Read More  बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणा-या मो. शरीफ यांना निमंत्रण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या