29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेने १६ भारतीय मच्छिमारांना पकडले

श्रीलंकेने १६ भारतीय मच्छिमारांना पकडले

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेच्या नौदलाने १६ भारतीय मच्छिमारांना पकडले आहे. श्रीलंकेच्या नौदलाने दोन बोटींसह १६ भारतीय मच्छिमारांना त्यांच्या समुद्री क्षेत्रात अवैध मासेमारी केल्याप्रकरणी अटक केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने रविवारी अवैध शिकार करणा-या १६ भारतीय मच्छिमारांसह दोन ट्रॉलर बोटी जप्त केल्या आहेत.

श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले की, १२ मार्च रोजी श्रीलंकेच्या समुद्री क्षेत्रात शिकार करणा-या बोटींचा मागोवा घेण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली होती. या कारवाईअंतर्गत श्रीलंकेच्या जलक्षेत्रात मासेमारी करणा-या दोन बोटींसह १६ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या