21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक २० जुलै रोजी

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक २० जुलै रोजी

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैपर्यंत नामांकन करता येईल. तसेच २० जुलै रोजी या पदासाठी मतदान होणार आहे, असे श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांच्या हवाल्याने सांगितले आहे.

राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी १३ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. आर्थिक संकटाचा सामना करणा-या श्रीलंकेची परिस्थिती बिकट झाली आहे. रस्त्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्वत्र आंदोलक दिसत आहेत. पेट्रोल, वीज, अन्न यासारख्या मूलभूत सुविधांसाठी लोकांचा संघर्ष सुरू आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. याचा फटका नेत्यांना सहन करावा लागत आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावर ९ जुलै रोजी आंदोलकांनी हल्ला केला होता. आता श्रीलंकेत सर्वत्र लष्कर तैनात करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या