34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeआंतरराष्ट्रीयशाळा सुरू करणं इज्राइलला पडलं महागात : 250 मुलं कोरोना संक्रमित, 6800...

शाळा सुरू करणं इज्राइलला पडलं महागात : 250 मुलं कोरोना संक्रमित, 6800 क्वारंटाइन

एकमत ऑनलाईन

जेरूसालेम, 04 जून : कोरोनाव्हायरस नियंत्रणात असलेल्या काही मोजक्याच देशांपैकी एक देश इज्राइल. त्यामुळेच या देशानं मेच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू केल्या आणि त्यांचा हा एक निर्णय त्यांना महागात पडला. शाळा सुरू करताच मुलं आणि शाळेचे कर्मचारी मिळून एकूण 261 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यामुळे 6800 मुलांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

NPR च्या वृत्तानुसार, इज्रायलच्या शाळेतील 261 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 261 कोरोना संक्रमितांमध्ये 250 मुलं आहेत. यानंतर 6800 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 17,377 वर पोहोचली आहे.

अचानक प्रकरणं वाढल्यानं इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शाळा अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत शाळेतील मुलं आणि कर्मचारी पूर्णपणे कोरोनामुक्त होत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

Read More  मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणात कायदेशीर अडचणी

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या