34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयदहशतवादाला पोसणे बंद करा; भारताने पाकला सुनावले

दहशतवादाला पोसणे बंद करा; भारताने पाकला सुनावले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेत भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानने आधी दहशतवादाला पोसणे बंद करावे, त्यानंतरच परिषदेला यावे, अशा कडक शब्दांत पाकला सुनावले आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाºया पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्राच्या फायनांशियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये समावेश केला आहे. मानवी हक्क परिषदेच्या ४६ व्या सत्रात राइट टू रिप्लाय याचा उपयोग करत भारताने पाकिस्तानवर शरसंधान केले.

आमच्या शेजारील देशाने दहशतवाद्यांना पोसणे आणि आपल्या देशातील अल्पसंख्याकांचा छळ करणे बंद करावे. त्यानंतरच परिषदेला यावे, अशी टीका भारताने केली. पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठाचा वापर भारताविरोधात केवळ अपप्रचार करण्यासाठी वापर केला जातो, असं भारताच्या स्थायी मिशनचे सचिव पवनकुमार बधे यांनी म्हटले. यासोबतच आर्थिक संकटाचा सामना करणारÞ्या पाकिस्ताननं परिषदेचा वेळ वाया घालवणं बंद करायला हवं, असाही खोचक टोला त्यांनी लगावला.

पाक दहशतवाद्यांना पेंशन देतेय
पाकने सीमेवरील दहशतवाद रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासोबत देशातील अल्पसंख्याकावरील अत्याचार थांबवायला हवेत. संयुक्त राष्ट्र संघाने मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडूनच पेंशन दिले जाते़ याची परिषदेला उपस्थित असणाºया सर्वांनाच कल्पना आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पोसण्याचे काम सुरू आहे. ते केव्हा थांबणार? यावर कडक भूमिका घेण्याची गरज असल्याचेही पवनकुमार बधे म्हणाले.

दहशतवादाला समर्थनातून मानवी हक्कांची पायामल्ली
पाकिस्तान हा दहशतवादी निर्माण करणारा कारखाना आहे याची कबुली खुद्द पाकिस्तानातील काही नेत्यांनीच याआधीही दिली आहे, याचा पुनरुच्चार भारताने परिषदेत केला. मानवी हक्कांची पायामल्ली करणारे दहशतवाद हे अतिशय गंभीर स्वरुप आहे. दहशतवाद्यांना समर्थन दिल्यामुळे मानवी हक्कांची पायामल्ली होते याची नोंद संयुक्त राष्ट्राने घ्यावी, असे भारताने म्हटले.

मार्च ते मेदरम्यान उष्णतेत वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या