28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home आंतरराष्ट्रीय फ्रान्सकडून पाकिस्तानला जोरदार चपराक

फ्रान्सकडून पाकिस्तानला जोरदार चपराक

मिराज विमाने, पाणबुडीच्या अपग्रेडेशनला नकार ; मॅक्रॉनवरील टीका भोवली

एकमत ऑनलाईन

पॅरिस : पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज फायटर विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि अगस्ता ९० बी वर्गातील पाणबुडी आहे. पाकिस्तानने या शस्त्रांमध्ये सुधारणा (अपग्रेडेशन) करण्याची विनंती केली होती. मात्र फ्रान्सने ही विनंती स्पष्टपणे धुडकावून लावत पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली आहे. इस्लाम कट्टरपंथीयांबाबत मॅक्रॉन यांच्या कारवाईवर केलेली टीका पाकिस्तानला भोवली असून फ्रान्सने पाकिस्तानला जागा दाखवली आहे.

मध्यंतरी मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतली त्यावरुन मुस्लिम देशांमध्ये त्यांचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती. फ्रान्सने पाकिस्तानच्या संरक्षण सामुग्रीच्या अपग्रेडेशनला दिलेला नकार ही त्याचीच परिणीती आहे, असे समजले जात आहे.

फ्रान्स – पाकिस्तान बिघडलेल्या संबंधांचाही परिणाम
पाकिस्तान आणि फ्रान्समध्ये संबंध बिघडले आहेत. पाकिस्तानकडून येणारी कोणतीही विनंती फ्रान्सकडून सविस्तर तपासली जाते. सप्टेंबर महिन्यात चार्ली हेब्दो मॅगझिनच्या जुन्या आॅफिसजवळ हल्ला झाला होता. अली हसन नावाच्या पाकिस्तानी वंशाच्या युवकाने दोन जणांना भोसकले होते. मॅगझिनचे आॅफिस दुसºया ठिकाणी आहे, याची त्याला कल्पना नव्हती. हल्ल्यानंतर अली हसनचे पाकिस्तानातील वडीलांनी माझ्या मुलाने खूप चांगले काम केले असून मी आनंदी आहे. असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून विविध कारणांमुळे फ्रान्स आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.

लसीकरणाच्या नियोजनासाठी कोविन अ‍ॅपची तयारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या