22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनाचा खरा आकार आणि चित्रे शोधण्यास यश

कोरोनाचा खरा आकार आणि चित्रे शोधण्यास यश

एकमत ऑनलाईन

बीजिंग : कोरोना विषाणूच्या महासाथीचा आजार संपवण्यासाठी लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर आली आहे. चिनी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूची प्रथमच चित्रे तयार केली आहेत. याद्वारे कोरोना विषाणूबद्दल अनेक मोठे खुलासे झाले आहेत. कोरोना विषाणूचा आकार टोकेरी आकाराचा आहे. कोरोनाचा विषाणू मानवी शरीरात गेल्यानंतर पेशींमध्ये होणा-या बदलांबाबतचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाचा खात्मा करण्यासाठी लस विकसित करण्यामध्ये मदत होत आहे.

कोरोना विषाणूबाबत हा खुलासा झाल्यानंतर आता कोरोनावर लस आणि उपचार सापडण्यात मदत होईल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. चीनमधील त्सिगुआ विद्यापीठातील बायोलॉजिस्ट डॉक्टर साई ली या हंग्झहूमधील एका बायोसॅफ्टी प्रयोगशाळेत विषाणूतज्ज्ञांसोबत काम करत आहेत. हे तज्ज्ञ प्रयोगशाळेत कोरोना विषाणू तयार करत आहेत. या तज्ज्ञांनी विषाणूला एका रसायनात टाकले आहे. जेणेकरून या विषाणूंमुळे नुकसान होऊ नये.

माइक्रोस्­कोपमध्ये दिसला कोरोनाचा विषाणू
ली आणि त्याच्या संशोधकांच्या टीमने विषाणूंनी भरलेला द्रव पदार्थ एका थेंबात टाकून तो गोठवला. ली आणि त्याच्या टीमने नंतर त्याला क्रयो-इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपद्वारे पाहिले.

विषाणूला जवळून पाहणारा पहिला व्यक्ती : ली
कोरोना विषाणूने भरलेली संपूर्ण स्क्रीन मी पाहिली. कोरोनाचा विषाणू हा एक इंचाच्या दहा लाखाव्या भागापेक्षा कमी आहे. कोरोनाच्या विषाणूला इतक्या जवळून पाहणारा मी पहिली व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे आता कोरोना विषाणू मानवी पेशींत कशाप्रकारे शिरकाव करतात, हे समोर आले आहे.

कोरोना विषाणू कसा थैमान घालतो?
या छायाचित्रांमुळे कशाप्रकारे दूषित जीन्स मानवाच्या बायोकेमिस्ट्रीवर परिणाम करतात याचीही माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे. संशोधकांच्या नुसारे, काही व्हायरल प्रोटीन आपल्या जीव पेशींवर हल्ला करतात आणि अन्य व्हायरल प्रोटीन नवीन व्हायरस तयार करण्यासाठी पोषक वातावरण तयार करतात. काही शास्त्रज्ञ सुपरकॉम्प्युटरच्या माध्यमातून व्हर्च्युअल विषाणू तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा विषाणू कशाप्रकारे थैमान घालतो, हे यामुळे लवकरच स्पष्ट होण्यास मदत मिळणार असल्याचे समजते.

कृषी कायदे : मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या