30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइंग्लंडमध्ये नेझल स्प्रेची चाचणी यशस्वी

इंग्लंडमध्ये नेझल स्प्रेची चाचणी यशस्वी

एकमत ऑनलाईन

लंडन : जगभरात कोरोना संसर्गाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे बाधितांवरील उपचाराचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे. अशा स्थितीत ब्रिटनमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका क्लिनिकल चाचणीत सॅनोटाइजद्वारे कोरोनावर प्रभावीपणे उपचार करण्यास यश मिळाले आहे.

सॅनोटाइज हे नेझल स्प्रे आहे. सॅनोटाइजच्या वापरानंतर कोरोनाबाधितांमधील विषाणूचा प्रभाव २४ तासामध्ये ९५ टक्के आणि ७२ तासांमध्ये ९९ टक्के कमी झाला असल्याचे समोर आले आहे. ही क्लिनिकल चाचणी बायोटेक कंपनी सॅनोटाइज रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि ब्रिटनच्या अ‍ॅशफोर्ड अ‍ॅण्ड पीटर्स हॉस्पिटल्सने केली आहे. शुक्रवारी या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

सॅनोटाइज नेझल स्प्रे एक सुरक्षित आणि प्रभावी अ‍ॅण्टी व्हायरल उपचार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येणे शक्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या नेझल स्प्रेमुळे विषाणूची तीव्रता कमी होऊ शकते. आधीच बाधित असलेल्या रुग्णांना दिलासा मिळू शकतो. चाचणी दरम्यान, ७९ करोनाबाधित रुग्णांवर सॅनोटाइज नेझल स्प्रेचा कितपत परिणाम होतो हे याचा अभ्यास करण्यात आला.

नेझल स्प्रेच्या वापरामुळे या रुग्णांमधील सार्स-कोव्ह-२ विषाणूचा प्रभाव कमी झाला. पहिल्या २४ तासामध्ये सरासरी व्हायरल लॉग कमी होऊन १.३६२ इतका झाला. तर, विषाणूचा व्हायरल लोड जवळपास ९५ टक्के कमी झाला आणि ७२ तासांमध्ये व्हायरल लोड ९९ टक्केहून अधिक कमी झाला असल्याचे आढळून आले.

परमबीर सिंग यांची खातेनिहाय चौकशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या