22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

एकमत ऑनलाईन

लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती. बोरिस जॉन्सन यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप झाल्याने त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक यांच्याकडे पंतप्रधानपद येणार आहे. इंग्लंडसारख्या मोठ्या देशाचे पंतप्रधान झाल्यास ही भारतासाठी नक्कीच गौरवाची गोष्ट असेल. सुनक हे भारतीय उद्योजक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचे कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एमएचे शिक्षण घेतले. ऋषी सुनक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. २०१५ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे. कोरोनाच्या काळात सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या