37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयथोडक्यात बचावलो! लघुग्रह पृथ्वीच्या एकदम जवळून गेला

थोडक्यात बचावलो! लघुग्रह पृथ्वीच्या एकदम जवळून गेला

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : पृथ्वी ही अनंत अवकाशात तरंगत असलेली एक ग्रह आहे. मात्र पृथ्वीशिवायही असंख्य ग्रहगोल अवकाशात तरंगत आहेत. त्यातील काही लघुग्रहांचा पृथ्वीला धोका असल्याचा इशारा वारंवार शास्त्रज्ञांकडून दिला जात असतो. अशातच शुक्रवार व शनिवारच्या रात्रीदरम्यान एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेल्याची माहिती अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांनी दिली आहे. चंद्रापेक्षाही कमी अंतरावरुन हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

एपोफिस ९९९४२ असे या लघुग्रहाचे नाव असून पृथ्वीपासून १ कोटी ४ लाख ९९९४२ मैल इतक्या अंंतरावरुन तो गेला. याचा अर्थ तो चंद्र व पृथ्वी यांच्यामधून गेला,तसेच दक्षिण गोलार्धातून या लघुग्रहाला पाहता आल्याचेही नासाच्या जेट प्रप्­लशन लॅबच्या रडारविषय शास्त्रज्ञ मरीना ब्रोजोविक यांनी सांगितले आहे. एपोफिसचा युनानी भाषेतील अर्थ प्रलयकाळाचा देव असा आहे. त्यावरुन या ग्रहाला एपोफिस असे नाव दिलेले आहे. सध्या जरी पृथ्वीवासिय या उपग्रहाच्या धडकेपासून थोडक्यात बचावले असले तरी धोका टळलेला नाही. १३ एप्रिल २०२९ ला हा उपग्रह पुन्हा पृथ्वीपासून खूपच जवळ म्हणजे केवळ १९ हजार ८०० मैल अंतरावरुन जाणार आहे. यावेळी तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असल्याचा दावा ब्रोजोविक यांनी केला आहे.

३ फुटबॉल स्टेडियमएवढे आकारमान
हा लघुग्रह ११२० फुट रुंद आहे. ३ फुटबॉल स्टेडियमच्या आकाराएवढे त्याचे आकारमान आहे. २०२९ मध्ये जेव्हा पृथ्वीच्या एकदम जवळून जाईल तेव्हा पृथ्वीच्या वातवरणात वेगवेगळया देशांनी सोडलेले उपग्रहांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तेव्हा तो आॅस्ट्रेलियातून पाहता येईल,असेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

पृथ्वीवर ४८ वर्षात आदळणार
हवाई विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञांनी तर असा दावा केला आहे की येत्या ४८ वर्षांमध्ये हा उपग्रह पृथ्वीवर आदळण्याची दाट शक्यता असल्याचा दावाच केला आहे. जेव्हा तो आदळेल तेव्हा तब्बल ८८ कोटी टन टीएनटी इतक्या तीव्रतेचा स्फोट होण्याची शक्यता असून त्यामुळे पृथ्वीवरील फार मोठ्या भागावर प्रलय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नासाच्या शास्त्रज्ञांकडून त्याच्यावर डोळयात तेल घालून लक्ष ठेवले जात आहे, असेही मरीना ब्रोजोविक यांनी सांगितले आहे.

दीदींकडून बंगालचा विश्वासघात; पंतप्रधान मोदींची टीका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या