लंडन : तुम्हाला अधिक कामाचा ताण आहे का? ही कामे करणे तुमच्या आवाक्याबाहेर आहे असे वाटत आहे का? अशा स्थितीला टास्क पॅरालिसिस म्हणतात. बोस्टन विद्यापीठाच्या क्लिनिकल असिस्टंट प्रोफेसर एलन हेंद्रिकसेन सांगतात, कामाचा व्याप घाबरवून टाकतो. नापास झाल्यानंतरची, कमी लेखल्याची, मूर्ख किंवा लायक नसल्याची ही भीती असू शकते. अशा स्थितीत योजना बनवणारा मेंदूचा स्वत:वरील नियंत्रण गमावतो.
कामाचे ठिकाण स्वच्छ केल्याने मेंदू कामाची तयारी करायला लागतो, स्वत:ला म्हणा काम पूर्ण होईपर्यंत ब्रेक नाही कामाची अनेक तुकड्यांत विभागणी करा. कॅलगॅरी विद्यापीठाचे प्राध्यापक पीयर्स स्टील म्हणतात, आपल्या कामाचे इतके लहान तुकडे करा की, मेंदूला ते सोपे वाटू लागतील. ते निश्चित करा. यामुळे स्ट्रेस हार्मोन रिलीज होणे कमी होत जाते. तणाव कमी होतो तेव्हा मेंदू काम करण्यासाठी तयार होतो.