27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिका-चीनमधील तणाव वाढला

अमेरिका-चीनमधील तणाव वाढला

चीनचा समुद्रात युद्ध सराव, तर अमेरिकेकडून चीनला घेरण्यासाठी हालचाली

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : संसर्गावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे चीन व अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण होत असताना त्यात दक्षिण चीन समुद्राच्या वादाने आणखी भर टाकली आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन आपल्या शेजारच्या देशांना घाबरण्यासाठी सातत्याने या ठिकाणी युद्ध सराव करत असून सातत्याने युद्ध नौका पाठवत आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेकडूनही चीनला घेरण्यासाठी हालचालींना वेग आला आहे़

कोरोना संकटाशी संपूर्ण जग झगडत असताना चीनने दक्षिण चीन समुद्रात दादागिरी करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमेरिका चीनच्या विरोधात पावले उचलत आहे. अमेरिकेने चीनला जल, आकाश आणि जमिनीवर घेरण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने तैवानला अत्याधुनिक शस्त्रे दिले आहेत. तैवान आणि चीनमध्ये तणाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेला शस्त्रपुरवठा महत्त्वाचा समजला जात आहे.

चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फंगे यांनी अमेरिकेने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्यास चीनला त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे सांगितले होते. दक्षिण चीन समुद्रावर चीन ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मागील काही दिवसांत चीनने दक्षिण समुद्रातील ८० जागांची नावे बदलली आहेत. यामध्ये २५ बेटं आहेत. तर, ५५ ठिकाणे ही समुद्राखाली तयार झालेली ठिकाणे आहेत. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या हालचालींमुळे शेजारील छोटे देशांसह भारत आणि अमेरिकेतही चिंता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेकडून चीनविरुद्ध मोर्चेबांधणी
चीनने तैवानला दक्षिण समुद्रातील वादात धमकी दिल्यानंतर चीनला शह देण्यासाठी अमेरिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात आपल्या सहा विमानवाहू युद्धनौका उतरवल्या आहेत. अमेरिकन नौदलाच्या माहितीनुसार, युद्धनौका ट्रुमॅन, आइजनहावर, रीगर, निमित्ज, लिंकन आणि युएसएस फोर्ड पॅसिफिक समुद्रात गस्त घालत आहेत. अण्वस्त्रवाहू आणि विमानवाहू युद्धनौका चीनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेने अणवस्त्रवाहू पाणबुडी दक्षिण चीन समुद्रात तैनात केल्या आहेत.

हवाई मार्गांवरही नजर
अमेरिकेने तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई मार्गांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर अमेरिकेने आपले सर्वात बलशाली ड्रोनपैकी एक ‘एमक्यू-४ सी ट्रिटोन’ हे ड्रोन जपानजवळील गुआम नौदल तळावर तैनात केले आहे. हे ड्रोन विमान सर्वात अत्याधुनिक समजले जाते. या ड्रोनच्या मदतीने अमेरिका ५० हजार फूट उंचीवरून २००० मैल अंतरावरदेखील देखरेख ठेवू शकते. हे ड्रोन विमान ४७ फूट लांबीचे असून त्याच्या पंखाची रुंदी १३० फूट आहे. तर ड्रोनचे वजन ६७८१ किलो आहे. हा ड्रोन ५७५ किमी प्रतितास वेगाने ३० तासांपर्यंत उडू शकतो.

Read More  अमेरिका-इराणमध्ये तणाव वाढण्याची शक्यता

आॅस्ट्रेलियात अमेरिकन सैन्य
अमेरिकन नौदलाने पश्चिम पॅसिफिक महासागरात चीनच्या वाढत्या घुसखोरीला लक्षात घेता आॅस्ट्रेलियात सैन्य वाढवण्याास सुरुवात केली आहे. आॅस्ट्रेलियात जवळपास २५०० अमेरिकन नौदल सैन्य असणार आहेत. या दरम्यान अमेरिकेचे हे सैन्य मित्र राष्ट्रांसोबत युद्ध सरावही करणार आहेत. अमेरिकन नौदलाच्या जवानांना जल, आकाश आणि जमिनीवर युद्ध करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. चीनसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा युद्धसराव महत्त्वाचा समजला जात आहे.

क्षमता तपासण्यासाठी बॉमरची चाचणी
अमेरिकेने मागील काही दिवसांत युद्धजन्य परिस्थितीत आपली तयारी पाहण्यासाठी सहा बॉमरची तपासणी केली. हे बॉमर युएस स्ट्रॅटेजिक कमांडने युरोपीयन आणि इंडो-पॅसिफिक भागात चाचणी केली. दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढल्यानंतर ही चाचणी घेण्यात आल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. सात मे रोजी बॉमरची चाचणी झाली. स्ट्रॅटेजिक कमांडने कॉम्बॅक्ट कमांडसोबत संयुक्तरीत्या ही चाचणी केली. या दरम्यान, व्हाइटमॅन हवाईतळावरून दोन बी-२ स्पिरीट बॉमर, मिनॉट हवाई तळावरून २बी-५२ एच स्ट्रॅटोफॉट्रेसेस आणि बार्कस्डले हवाई तळावरून दोन बी ५५२ एचएस बॉमरची चाचणी करण्यात आली.

Read More  फक्त मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग कोरोनाला रोखू शकते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या