24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीन-अमेरिकेत तणाव

चीन-अमेरिकेत तणाव

एकमत ऑनलाईन

तैवानवरून वाद विकोपाला, चीन आक्रमक
बीजिंग : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानच्या दौ-यावरून चीन आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. नॅन्सी पेलोसी यांचे विमान तैवानच्या हद्दीत आल्यानंतर चीनने आक्रमक भूमिका घेतली असून तैवानचे तैपेई विमानतळ बॉंम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. नॅन्सी पेलोसी यांचे तैपेईमध्ये आगमन झाले असून पुढचे काही तास जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये येणार असल्याने चीनने या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे, तर दुसरीकडे तैवानमध्ये नॅन्सी पेलोसींचे स्वागत करण्यासाठी तिथल्या सरकारने मोठी तयारी केली आहे. चीनच्या या भूमिकेला आता रशियाचा पाठिंबा मिळाला असून त्यांनीही अमेरिकेवर चांगलीच टीका केली आहे.

गेल्या एका दशकापासून तैवानच्या मुद्यावरून चीन आणि अमेरिकेमध्ये मोठा तणाव आहे. तो आता शिगेला पोहोचल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीला अमेरिकेसमोर चीन आणि रशिया हे मोठे शत्रू आहेत. रशिया आता युक्रेनच्या युद्धामध्ये गुंतला असून हे युद्ध लांबल्यास रशियाची आर्थिक परिस्थिती ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेची वेगळी स्ट्रॅटजी
अमेरिकेसमोर आता चीन एक एकमेव मोठा स्पर्धक राहिला असून तोदेखील कोणत्यातरी युद्धात गुंतला तर त्याचाही विकास मंदावेल, अशी काहीसी स्ट्रॅटेजी अमेरिकेची आहे. त्या दृष्टीने तैवान हा अमेरिकेच्या हातात एक कोलित असून त्यामुळे चीन युद्धात गुंतू शकतो, अशा पद्धतीचे धोरण असल्याचे सांगितले जात आहे.

आशिया खंड युद्धाच्या उंबरठ्यावर?
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौ-यामुळे आशिया खंडावर युद्धाचे ढग जमा झाले असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. चीन आणि अमेरिकेत युद्ध झाले तर या युद्धात अनेक देश ओढले जातील. चीनला रशियाने पाठिंबा दिला असून त्यांच्या बाजूने इराण या युद्धात उतरण्याची शक्यता असून अमेरिकेच्या बाजूने ऑस्ट्रेलिया, जपान युद्धात उतरू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या